Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पोलिसांची पदभ्रमंती, पन्हाळगड - विशाळगड  मोहिमेत १५० जणांचा सहभागभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहातदोन वर्षांनी घुमला केशवराव भोसले नाट्यगृहात सूर - संगीताचा आवाज !  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाची नांदीवालावलकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी संगीतमय कवायतींचे सादरीकणतिटवे येथील शहीद संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर; आशासेविकांचे कागदी काम होणार कमीयुवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे – प्राचार्य अभयकुमार साळुंखेशाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहातस्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यापीठात तिरंगा रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

जाहिरात

 

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर; आशासेविकांचे कागदी काम होणार कमी

schedule15 Aug 26 person by visibility 86 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातमहा-पल्स एआयहा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कंमाड सेंटर उभारणारा पथदर्शी (पायलट) जिल्हा ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, केंद्रे, एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहेत, असे  प्रतिपादन राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.  

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड,  आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

"आशा साथी" हा जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणखी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. याव्दारे आशा सेविकांचे काम अधिक सोपे आणि जलद प्रभावी होणार आहेशासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा ऐतिहासिक कर्मचारी हिताचा निर्णय १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी नियमित जिल्ह्यातील सुमारे ४५८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes