तिटवे येथील शहीद संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
schedule16 Aug 26 person by visibility 49 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते आज शहीद संकुलात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचालन तसेच विविध देशभक्तिपर सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.यावेळी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अनिल पाटील, दिलीप देसाई, तिटवे गावचे पोलीस पाटील, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, मुक्ताई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सरिता धनवडे, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य हिमांशू चव्हाण, शहीद पब्लिक स्कूल चे प्राचार्य सागर भाट, व्यवस्थापक रोहन फराकटे, प्रा. दीपाली किल्लेदार, सलमा अत्तार, ऋषिकेश सुतार, स्वप्नील सडोलकर आदी उपस्थित होते.