सकल ब्राह्मण समाजातर्फे यंदा परशुराम जन्मोत्सव, शिवजयंती साधेपणाने
schedule26 Apr 25 person by visibility 218 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम ), कोल्हापूर चित्पावन संघ , कऱ्हाडे ब्राह्मण संघ तसेच सकल ब्राह्मण समाजातर्फे भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.’ माहिती डॉ. उदय कुलकर्णी, श्रीकांत लिमये यांनी पत्रकार परिषदेत दिली. काश्मीर पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. अशा प्रसंगामध्ये परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साजरा करण्यात येणारा भव्य कार्यक्रम करणे हे उचित वाटत नाही असे त्यांनी म्हटले.
यंदा मंगळवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता भगवान परशुराम आणि छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा साधेपणाने करणार आहोत. बिनखांबी गणेश मंदिर येथील मंगलधाम येथे समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत साधेपणाने होईल. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा ब्राह्मण संघाबरोबरच सारस्वत विकास मंडळ, ब्राह्मण पुरोहित संघ ,परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी, बीबीएफ पालखीमंडळ तसेच वी फॉर अवर्स युवा ग्रुपचे पदाधिकारी सदस्य कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेवेळी मकरंद करंदीकर , प्रसाद भिडे , धर्मराज पंडित , मिलिंद पावनगडकर , विनिता आंबेकर आदी उपस्थित होते.
…………….
वर्षभर विविध कार्यक्रम
दरम्यान सकल ब्राह्मण समाजातील विविध जाती पोट जाती संस्था संघटनांच्या माध्यमातून वर्षभर धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. समाजातील मौजी बंधन , संक्रांती कालावधीतील धुंदूरमास , चित्पावन अष्टमी जागर सोहळा अशा धार्मिक सोहळ्यांबरोबरच व्याख्याने, संगीत मैफल, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, महिलाविषयक कार्यशाळा , आर्थिक साक्षरतेसाठी कार्यशाळा असे उपक्रम राबवले जातात . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील बंधू-भगिनींबरोबरच विद्यार्थी गुणगौरव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो.