Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात, नागरी वस्तीत विमान कोसळलेकोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !नविद मुश्रीफांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! गोकुळच्या विस्तारासाठी सरकारकडून निश्चित मदत !!सोळा जूनला शाळा प्रवेशोत्सव ! लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी ! फुटले पेव, जिल्ह्यात १११ खासगी अॅकेडमी !  शिक्षण विभागाकडून ना तपासणी-ना नियंत्रण !!गावडे कुटुंबियांतर्फे म्हसळा शाळेस ५१ हजाराची देणगीमनसेतर्फे गुरुवारी शैक्षणिक साहित्याचे वाटपसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे पंधरा जूनला लावणी-लोकगीत गायनमहापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!

जाहिरात

 

महापालिकेसाठी प्रभाग रचनेचे आदेश ! कोल्हापूर-इचलकरंजी-सांगलीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती !!

schedule10 Jun 25 person by visibility 249 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे मंगळवारी (१० जून २०२५) महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना होणार आहे. अ, ब, क आणि ड वर्ग महापालिकेसाठी प्रभाग रचना करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. राज्यातील १९ ड वर्ग महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकेत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोंविदराज यांनी हा आदेश काढला आहे. या संबंधीचे आदेश प्रशासनाला लागू झाले आहेत.

प्रभाग  रचना करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य त्यानंतर पूर्व दिशेकडे निश्चिती करायची. पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत दक्षिणकडे प्रभागाची शेवट करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यायचे आहेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक संलग्नना राहील या पद्धतीने करायची आहे. प्रभाग रचना करताना कोणत्याही परिस्थितीमदये एका इमारतीचे, घराचे, चाळीचे विभाजन दोन प्रभागाात होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.  प्रभाग रचना महापालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महापालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या हे सूत्र आहे. या सुत्रानुसार  प्रभागात समाविष्ठ  करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी असे आदेश आहेत.

प्रभाग रचनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रारुप आराखडा महापालिका आयुक्तांसमोर ठेवण्यात येईल. आयुक्तांनी हा आराखडा नियमानुसार तयार केला आहे का ? हे तपासतील. त्यानंतर जिल्हाधिकारीमार्फत प्रारुप मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग अथवा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करतील.त्यांची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रारुप प्रसिद्धीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवतील.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes