Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!स्वंयसिद्धा-व्ही. टी. पाटील फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभकोल्हापुरात ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणीएअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात, नागरी वस्तीत विमान कोसळलेकोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !

जाहिरात

 

नविद मुश्रीफांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! गोकुळच्या विस्तारासाठी सरकारकडून निश्चित मदत !!

schedule11 Jun 25 person by visibility 128 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांच्यासह संचालकांनी बुधवारी (११ जून २०२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाली. गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मुश्रीफ हे मुख्यमंत्र्यांना भेटले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती, गोकुळची उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘गोकुळसारख्या सहकारी संस्थांच्या उद्योग विस्तारासाठी सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.’

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके,  जनसुराज्य युवाशक्ती प्रदेश अध्यक्ष समित कदम, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. याप्रसंगी गोकुळतर्फे मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, ‘मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी या परिसरात नवीन विस्तारित दुग्ध शाळेसाठी १५ एकरपर्यंत औद्योगिक भूखंड उपलब्ध करुन द्यावे. तसेच पुणे येथे नव्या पॅकिंग स्टेशनसाठी औद्योगिक भूखंड मिळावे. गाय दूध उत्पादकांना अनुदान दिले जाते; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूध उत्पादकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांनाही प्रतिलिटर अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने २०२५ पासून राज्यात लागू केलेल्या सौर उर्जा संदर्भातील मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमुळे वाढलेला आर्थिक भार लक्षात घेता, या धोरणाच्या अटी व शर्तींमध्ये शिथिलता आणावी अथवा फेरविचार करावा.’अशा मागण्या करण्यात आल्या.

यावर मुख्यमंत्र्यांनी, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊ’असे आश्वस्त केले. तसेच गोकुळचे स्वयंपूर्ण ऊर्जानिर्भरता या बाबतीत राज्य सरकारचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes