Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!स्वंयसिद्धा-व्ही. टी. पाटील फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभकोल्हापुरात ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणीएअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात, नागरी वस्तीत विमान कोसळलेकोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कारजिप बांधकाम कार्यकारी अभियंतापदी मानसिंग पाटील ! सचिन सांगावकर रस्ते विकास संस्थेवर !

जाहिरात

 

गावडे कुटुंबियांतर्फे म्हसळा शाळेस ५१ हजाराची देणगी

schedule11 Jun 25 person by visibility 110 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त गावडे कुटुंबियांतर्फे रायगड जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसळा प्रशालेस ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. एलआयसीमधील निवृत्ती अधिकारी मुरली गावडे, विवेवकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्यातर्फे धनादेश देण्यात आला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हसळा प्रशालेचे प्राचार्य डी. आर. पाटील यांच्याकडे मुरली गावडे यांना धनादेश प्रदान केला. प्राचार्य पाटील यांनी, म्हसळा प्रशालेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. प्रशालेचा पत्रा बदलण्यात येत आहे. या कामासाठी मदत म्हणून गावडे कुटुंबियांतर्फे दणगी दिल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. यावेळी माजी सहसचिव पी. एस. चव्हाण उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी मदत केल्याबद्दल आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes