Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
२७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणारएक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्रनाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंगकोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्ट

जाहिरात

 

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्र

schedule31 Jul 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि इंग्रजी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अणा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची सांस्कृतिक भूमिका' या विषयावरील विशेष एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या गणित अधिविभाग सभागृहात चर्चासत्र होईल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथील डॉ. बळीराम गायकवाड यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस मुख्य बीजभाषक म्हणून आपले विचार मांडतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यानंतरच्या चर्चासत्रात डॉ. मेघा पानसरे, डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. अंबादास सकट हे सहभागी होतील. या सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. गिरीष मोरे असतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. अक्षय सरवदे आणि इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes