एक दिवसाआड नको, दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [
schedule31 Jul 26 person by visibility 178 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील नागरिकांना नियमितपणे दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त राजेंद्र भारूड यांच्याकडे केली. सध्या कोल्हापूर शहरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे तर काळम्मावाडी धरण 61 टक्के पेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नियमित पाणीपुरवठा करावा. एक दिवसाआड पाणीपुरवठामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्वरूप कदम, अशकिन आजरेकर, शिला सोनुले, संगीता सावंत आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त भारुड यांची भेट घेऊन निवेदन दिले