Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
२७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणारएक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्रनाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंगकोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्ट

जाहिरात

 

नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणी

schedule31 Jul 26 person by visibility 102 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आग प्रकरणी फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालातील निष्कर्षाच्या आधारे गुन्ह्याचे योग्य कलमाखाली पुर्ननोंदणी करावी. आगीच्या घटनेची पुन्हा सखोल  व निष्पक्ष तपास झाला पाहिजे या मागणीचे निवेदन कोल्हापुरातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना दिले. अहवालामध्ये घटनास्थळी ज्वलनशील पदार्थ आढळल्याचे स्पष्ट नमूद केले त्यामुळे ही घटना केवळ अपघात नसून नियोजनपूर्वक घडून आणलेल्या कृत्याची शक्यता बळकट होते असेही निवेदनात म्हटले आहे. सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी ही त्यांनी केली.
     घटना घडण्यापूर्वी व त्यानंतरच्या परिसरातील सर्व मोबाईल टॉवर डम्प डेटा फोटो डिजिटल पुरावे तातडीने जप्त करून वैज्ञानिक विश्लेषण करावे. घटनास्थळी आढळलेल्या ज्वलनशील पदार्थांचा स्त्रोत शोधून संबंधित पेट्रोल पंप विक्रेताची कसून चौकशी करावी. तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन विशेष तपास पथक अथवा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे तपासवर्ग करावा अशी मागणी ही त्यांनी केली. तपासाच्या प्रगतीचा अहवाल सार्वजनिक करावा. शिवाय फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कायदेशीर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक विभागीय कार्यवाही करावी. यासंदर्भात लवकर आवश्यक ती कारवाई न झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करू असेही निवेदनात म्हटले आहे.शिष्टमंडळात महापालिकेतील विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर,  नगरसेवक प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, अमर समर्थ विनायक फाळके. रोहित कवाळे, विशाल चव्हाण, सचिन शेंडे, सचिन चौगुले, विनायक कारंडे, सुनील मोदी, दत्ता टिपुगडे, शशिकांत पाटील,सागर येवलुजे, संजय पटकारे, अरुण बारामती, अशोक पाटील,  संदीप बिरंजे आदींचा सहभाग होता. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी संगीत श्री केशवराव भोसले नाट्य घराच्या आगीची घटनाही शॉर्टसर्किटमुळे नव्हतं तर पेट्रोलजन्य ज्वलनशील घटकामुळे झाले आहे हे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट नमूद केले आहे तेव्हा या घटनेची पुन्हा एकदा सख चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. पोलीस प्रशासनाकडून शहरवासीयांच्या अपेक्षा मोठ्या आहेत तेव्हा या घटनेची कसून चौकशी करून दशीवर कारवाई झाली पाहिजे असेही ते म्हणाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यासंदर्भातील सगळी माहिती घेऊ कागदपत्रे पुन्हा तपासले जातील आणि या घटने संदर्भात महापालिकेकडून अधिक माहिती मिळण्यासाठी आपण आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes