Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
२७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणारएक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्रनाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंगकोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्ट

जाहिरात

 

केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंग

schedule31 Jul 26 person by visibility 60 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण केले नाही. केवळ चांगल्या सुविधांसाठी तांत्रिक सेवा, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थापनाचे आऊट सोर्सिंग केले आहे. बुकिंग ऑनलाइन असणार आहे. भाडेदरावर महापालिकेचे पूर्ण नियंत्रण असेल. रंगकर्मींनी शहरवासियांचे दिशाभूल करू नये अशी स्पष्ट ग्वाही महापौर रुपाराणी निकम व आयुक्त राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण केल्याचा आरोप करत रंगकर्मीनी भर पावसात आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, प्रा. जयंत पाटील, सभागृह नेते मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान,  शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास,  महापालिकेतील विराधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक प्रवीण केसरकर,  शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, स्वरुप कदम, सुरेखा ओटवकर, शिला सोनुले, संगीता सावंत,पूजा पोवार, आशकिन आजरेकर, स्वालिया बागवान, अनुराधा मुळीक आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. महापालिकेतीया बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर निकम म्हणाल्या, ‘ रंगकर्मीसोबत चार बैठका झाल्या. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा प्रस्ताव तयार केला. हाऊस किपिंग, तांत्रिक कर्मचारीबाबतत आऊट सोर्सिंग होणार आहे. नाट्यगृहात चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.’

………….

रंगकर्मी म्हणतात कसल्याही स्वरुपातील खासगीकरण नको, नाट्यगृहासंबंधीचा करार जाहीर करावा

दरम्यान रंगकर्मीनी पुन्हा एकत्र येत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे कसल्याही स्वरुपात खासगीकरण करू नये. नाट्यगृह सांस्कृतिक केंद्र म्हणून चालवावे. महसूलवाढीचे साधन म्हणून त्याकडे पाहू नये. नाट्यगृहाच्या उत्पन्नांशी संबंधित कोणताही करार हा खासगीकरणाकडे नेऊ शकतो. मुळात नाट्यगृहाचे भाडे कोणत्या निकषावर ठरणार ? असा सवाल रंगकर्मीनी केला आहे.महापालिका प्रशासनाने, खुली बैठक घेऊन नाट्यगृहासंबंधीचा प्रस्ताव, करारातील अटी या सर्वांदेखत जाहीर कराव्यात अशी मागणी रंगकर्मी सुनील घोरपडे, किरणसिंह चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes