Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचनादळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणारमाझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच...! अजित पवारांच्या आठवणीने मुश्रीफ व्याकुळडॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचच्या सभेत वंदे मातरमवर चर्चाएआयच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य - प्रफुल्ल खचणे संजय घोडावत आयआयटी - मेडिकल अकॅडमीचे जेईईमध्ये यशज्ञान- कौशल्य - सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री :  संजय बाबर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादव

जाहिरात

 

माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच...! अजित पवारांच्या आठवणीने मुश्रीफ व्याकुळ

schedule23 Feb 26 person by visibility 86 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी : ‘ विधानसभा सभागृहात मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रत्येक शपथविधीला स्वर्गीय  अजित पवार, मला म्हणायचे, "मुश्रीफसाहेब.... माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच......! कोणत्याही परिस्थितीत सकाळी दहा वाजता ते सभागृहात येणार. सभागृहात आल्यानंतर ते अध्यक्षांची भेट घेणार आणि बरोबर अकराच्या ठोक्याला ते आपल्या जागेवर येऊन बसणार. दुपारी जेवणासाठीच तेवढे बाहेर जाणार. त्यांचे कोल्हापूरवरही फार मोठे प्रेम होते. बारामतीवर तर साहजिकच प्रेम होते. तसेच;  कुठलीही चांगली गोष्ट बारामतीत आलीच पाहिजे आणि ती चांगलीच केली पाहिजे, असा त्यांचा अट्टाहासच होता.’ अशा शब्दांत मंत्री हसन मुश्रीफ यांनी  अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
 विधानसभेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीपर प्रस्तावावर बोलताना मंत्री मुश्रीफ व्याकुळ झाले. मुश्रीफ म्हणाले, ते सभागृहात सातत्याने सर्वच आमदारांकडे लक्ष देत असत. ते अतिशय हजर जबाबी होते. या सभागृहातील हेडमास्तर म्हणूनच काम करीत होते. वक्तशीरपणा हे तर त्यांचे मुख्य अंगभूत वैशिष्ट्य होते. कोणतीही मीटिंग असो त्या आधी अर्धा तास त्यांचा फोन खणाणणार. सर्वांना वेळेवरच उपस्थित राहावे लागणार. असा हा आमचा अत्यंत कडक शिस्तीचा नेता. त्यांना टापटीप अतिशय आवडायची. ते स्वतः व्यवस्थित राहायचे, दुसरे व्यवस्थित नसतील तर त्यांना तोंडावरच सांगायचे. मला खरोखरच आश्चर्य वाटतंय, जे पोटात तेच ओठात, असे रोखठोक अजितदादा होते. जे सत्य असेल तेच बोलणार. बारामतीमधून सल्लग आठवेळा लाख- दीड लाखाहून अधिक मताधिक्याने जिंकणारे त्यांचे नेतृत्व होते.’

१९९९ मध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो आणि दोन महिन्यातच त्यांनी मला मंत्री केले. कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी स्वर्गीय कै. बाबासाहेब कुपेकरसाहेब आणि स्वर्गीय कै. दिग्विजय खानविलकरसाहेब हे दोन मंत्री असताना मला तिसरा मंत्री केले. आजअखेर मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादा मला नेहमी म्हणायचे, "मुश्रीफसाहेब, माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच." या आठवणींना उजाळा देताना मुश्रीफांना गहिवरुन आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes