Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचनादळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणारमाझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच...! अजित पवारांच्या आठवणीने मुश्रीफ व्याकुळडॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचच्या सभेत वंदे मातरमवर चर्चाएआयच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य - प्रफुल्ल खचणे संजय घोडावत आयआयटी - मेडिकल अकॅडमीचे जेईईमध्ये यशज्ञान- कौशल्य - सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री :  संजय बाबर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादव

जाहिरात

 

डॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचच्या सभेत वंदे मातरमवर चर्चा

schedule23 Feb 26 person by visibility 132 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डॉ. सुनीलकुमार लवटे विचार मंचच्या मासिक बैठकीत ‘वंदे मातरम’ आणि कुरूंदवाड कुमार विद्या मंदिर नंबर तीन या शाळेतील विद्यार्थी वाढीच्या प्रयोगाबद्दल चर्चा झाली.  अध्यक्षस्थानी डॉ. बी. एम. हिर्डेकर होते. 
   कार्याध्यक्ष डॉ. विश्वास सुतार यांनी विचार मंचचे कार्य, उद्देश याबाबतची माहिती दिली. तसेच कुमार विद्या मंदिर कुरुंदवाड नं ३ या शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानात कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रंथ ,शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी 'वंदे मातरमचा इतिहास' या विषयावर  मार्गदर्शन केले. बंकिमचंद्र चटोपाध्याय/चॅटर्जी यांचे लेखन आणि वंदे मातरमची वाढत गेलेली चळवळ, इंग्रजांचे फोडा व झोडा हे धोरण आणि हिंदू-  मुस्लिम यांच्यात वाढवलेली दरी, बंगालची फाळणी असा सारा इतिहास त्यांनी डोळ्यासमोर उभा केला. ‘वंदे मातरम्’ चे सध्या सुरू असलेले राजकारण आणि त्यामागील कारणमीमांसा यावरही त्यांनी भाष्य केले.
    संदीप मगदूम, उमेश सुर्यवंशी, जार्ज क्रूझ यांनीही मते मांडली. मंचच्या सदस्यांना 'प्रांजळाचे आरसे' हा बृहद ग्रंथ डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यावतीने भेट देण्यात आला. यावेळी डॉ. जी. पी. माळी, प्रभाकर हेरवाडे, प्रा. टी. के. सरगर, संजय कळके, अमेय जोशी, चंद्रकांत निकाडे उपस्थित होते. मंचचे सहसचिव दीपक जगदाळे यांनी स्वागत केले. यशवंती शिंदे यांनी आभार व्यक्त केले. 
             
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes