संजय घोडावत आयआयटी - मेडिकल अकॅडमीचे जेईईमध्ये यश
schedule22 Feb 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमीच्या अथर्व खोतने जेईई मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेत ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवले. संस्थेच्या सहिम पटवेगार (९९.८१) उपेंद्र तेलसंग (९९.८०) विवेक तोडकरी (९९.७९) अथर्व निर्वाणे (९९.७८), तनय दागा (९९.७६) पर्सेटाईल गुण मिळवून विद्यार्थ्यानी उल्लेखनीय कामगिरी केली . सहिम पटवेगार या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेटाईल गुण मिळाले. संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईल च्या वरती गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक वासू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.