Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजनापंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदनजोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवससंजय घोडावत इन्स्टिट्यूटला बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५ पुरस्कारजनता आमच्यासोबत, कोणी गेले -आले तर फरक पडत नाही : सतेज पाटीलरविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधावाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंधशाळा बंद पाडणारा मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जीआर रद्द करा, कोल्हापुरात शिक्षकांचे जोरदार आंदोलन

जाहिरात

 

रविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधा

schedule13 Jun 25 person by visibility 79 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून १८ ठिकाणी रविवारी (१५ जून २०२५) ४० वी सेट परीक्षा होत आहे. दरम्यान कोल्हापूर सेंटरवर दहा हजार ६८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोल्हापूर शहरात २६ सेंटरवर परीक्षा होणार आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेत पहिला तर सकाळी ११.३० दुपारी १.३० या दुसरा पेपर आहे. शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र विभागाची इमारत, भाषा भवन, पर्यावरण विज्ञान विभाग, रसायनशास्त्र अधिविभाग आणि डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी या विभाग येथे परीक्षा केंद्र असणार आहे. कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज परिसरात सहा सेंटर आहेत.न्यू कॉलेज कॅम्पसमध्ये पाच सेंटर आहेत. तसेच सायबर, राजाराम कॉलेज, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज, पद्माराज गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल,छत्रपती शहाजी महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी, शांतिनिकेतन मोरेवाडी, महावीर कॉलेज येथे सेट परीक्षेचे आयोजन केले आहे अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे सेट परीक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत अनभुले यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes