जिल्हा परिषदेत सदभावना दिनानिमित्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
schedule21 Aug 26 person by visibility 69 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सदभावना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिन साजरा होतो. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदभावना दिनी शपथ घेतली. तसेच ‘जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यांचा भेद न करता सर्व भारतीयांचे भावनिक ऐक्य व सामंजस्यासाठी कार्य करण्याची तसेच आपापसातील मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संवाद व संविधानिक मार्गाने सोडविण्याची ’प्रतिज्ञा केली