प्रशासनाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या शाळांना पत्र, डिजीटल फलक अद्ययावत करावा
schedule20 Aug 26 person by visibility 40 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महापालिकेच्या मालकीच्या शाळेतील डिजीटल फलक अद्ययावत करावेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नावासमोरील जात प्रवर्ग व संवर्ग उल्लेख असलेले फलक तत्काळ काढून टाकावेत असे पत्र प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांना काढले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या शाळेमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी, महापालिकेच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला होता. वास्तविक महापालिका शाळेत शिक्षकांच्या नावासमोर जातीचा नव्हे प्रवर्गांचा उल्लेख असलेले फलक अनेक वर्षापासून आहेत. शिक्षकांच्या नावासमोर ते ज्या प्रवर्गातील आहेत, त्या प्रवर्गाचा उल्लेख उदाहरणार्थ ओपन, एनटी, एससी, एसटी, ओबीसी असा उल्लेख करणारे फलक शाळेत आहेत. दरम्यान या फलकावरुन नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाधिकारी जाधव यांनी काढले आहेत. त्या संबंधीचे पत्र त्यांनी शिक्षण समितीच्या अखत्यारितील महापालिका शाळांना पाठविली आहेत. तसेच प्राथमिक शिक्षण समितीची कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे. सभापती, उपसभापती व सदस्यांची निवड झाली आहे. फलकावर त्यांच्या नावासह शाळा प्रभागातील नगरसेवकांची नावे, शिक्षण समिती व समग्र शिक्षाकडील अधिकाऱ्यांच्या नावाची माहिती असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
…………………….
त्या शाळेकडून खुलासा मागविणार
शिक्षकांच्या नावासमोर जातीचा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत नगरसेवकांनी शाळेचा फलक सभागृहात दाखविला होता. आयुक्तांनी, याप्रश्नी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला नोटिस पाठवून खुलासा मागवून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण समितीकडून संबंधित शाळा मुख्याध्यापकांना नोटिस काढण्यात आली आहे. त्यांना यासंबंधी म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.