Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीडीएफची रविवारी पुण्यात बैठक, शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीप्रशासनाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या शाळांना पत्र, डिजीटल फलक अद्ययावत करावाअधिकारी कंत्राटदारांची मिलीभगत, रस्ते कामात ढपला - डिझेल विक्रीत डल्ला ! महापालिका सभेत नगरसेवकांकडून पोलखोल ! !भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना  रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रमतेली समाजाचा राज्यव्यापी मेळावा रविवारी कोल्हापुरात ! चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती !!कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!

जाहिरात

 

टीडीएफची रविवारी पुण्यात बैठक, शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती

schedule20 Aug 26 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आगामी काळात होऊ घातलेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत शिक्षक लोकशाही आघाडीकडून निवडणुकीस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन हायस्कूल मधील नाथ पै  सभागृहामध्ये दुपारी १२.३० वाजता या मुलाखती होतील. दरम्यान महाराष्ट्र शिक्षक लोकशाही महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी. के. थोरात, राज्य सचिव के. एस. ढोमसे, पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे,विभागाचे सचिव मुरलीधर मांजरे, पुणे विभागाचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे, राज्य प्रतिनिधी  प्राचार्य राज मुजावर यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच पुण्यात आढावा बैठक झाली.

बैठकीत थोरात म्हणाले की येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने उमेदवार दिला जाणार आहे. ही उमेदवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीची तयारी, मतदारसंघातील संपर्क, शिक्षक संघटनेशी असणारी बांधिलकी, निवडून येण्याची क्षमता तसेच शिक्षकांच्या प्रति असलेली तळमळ या गोष्टी विचारात घेऊन दिली जाणार आहे.या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 23 ऑगस्ट 2026 रोजी होत आहेत. ’तर संघटनेचे  राज्य सचिव के. एस. डोमसे व पुणे विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी, ‘इच्छुक उमेदवारांनी संघटनेकडे रीतसर अर्ज करून  मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes