उद्योगरत्न पुरस्कार सोहळयात सचिन शिरगावकरांनी सांगितली यशाची चतु:सूत्री
schedule21 Aug 26 person by visibility 78 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘नाविन्याचा ध्यास, कष्ट, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी’ या चतुसूत्रीमुळेच आपण यशस्वी झालो. उद्योग-व्यवसया करत असताना डोके शांत आणि बोलणं गोडं असावं…’अशा शब्दांत एस बी रिशेलर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर व उद्योजक सचिन शिरगावकर यांनी यशस्वितेचा मंत्र दिला.
निमित्त होतं, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्तर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभाचे. या समारंभात पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेडचे संस्थापक व चेअरमन आनंद देशपांडे यांच्या हस्ते उद्योजक सचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्स असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सॅटर्डे क्लबचे चेअरमन अजित मराठे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम झाला.
सत्काराला उत्तर देत असताना शिरगावकर यांनी, उद्योग क्षेत्रातील वाटचालीचा प्रवास उपस्थितांसोबत शेअर केला. ‘मला जो पुरस्कार आहे, तो पुरस्कार मी आजपर्यंतच्या वाटचालीत मला पाठबळ देणाऱ्या कुटुंबीय व कर्मचाऱ्यांना समर्पित करतो. कोल्हापूरने मला खूप काही दिले. चांगली माणसे, मित्र, उद्योग करण्याची, आपलेपणाची भावना दिली. उद्योग, व्यवसायात काम करताना मी नेहमीच नाविन्याचा ध्यास, कष्ट, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी’हे सूत्र केंद्रस्थानी ठेवले. त्यानुसार सक्रिय राहिल्याने यशस्वी ठरलो.’असे शिरगावकर यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते डॉ. आनंद देशपांडे म्हणाले, ‘उद्योजक, व्यावसायिकांनी नेहमी नवीन संधी शोधल्या पाहिजेत. ग्राहकांच्या गरजा ओळखा. यशस्वी होण्यासाठी आर्थिक भांडवलीसोबतच कामात सातत्, योग्य विचार आणि कृतीची जोड हवी. यासाठी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडा. तंत्रज्ञानाचा अंगिकार, कौशल्ये आत्मसात करायला हवीत आणि बाजारपेठेतील स्पर्धा ओळखून उद्योग विस्तारीत करा कर्मचारी आणि व्यवस्थापन वर्गात ‘माझी नाही…आपली कंपनी’ही भावना निर्माण झाली पाहिजे.’ट्रस्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित मराठे म्हणाले, ‘कोणताही उद्योजक आणि उद्योग एकदम मोठा होत नाही. त्यासाठी सातत्याने काम करावे लागते, सकारात्मक वृत्तीने वाटचाल करावी लागते. आनंदी वृत्ती आवश्यक असते.’ स्ट्स्टचे कोल्हापूर शाखेचे नरेंद्र जोशी यांनी स्वागत केले. ट्रस्टचे डेप्युटी सचिव महेश इनामदार, ट्रस्टचे रिजन हेड योगेश देशपांडे, दिग्विजय दापके, आनंद साळुंखे, कविता जोशी, दीपा देशपांडे, रविराज अहिरराव, प्रमोद कमलाकर, अॅड. कुलदीप कोरगावकर, विशाल मंडलिक, महेश इनामदार, अवधूत गुरव आदी उपस्थित होते.