Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

अपूर्ण नव्हे, तर स्वयंभू... मन में है विश्वास, हम होंगे कामयाब!

schedule07 Aug 25 person by visibility 75 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन : त्यांचे जगच वेगळे... शब्दांच्या पलीकडचे, केवळ सांकेतिक खुणांचे आणि नजरेतील भावांचे. ही भाषा कदाचित आपल्याला सहज कळणार नाही, पण त्यांच्या डोळ्यांतील चमक बघा... त्यात भविष्याबद्दलचा अढळ विश्वास दिसतो. जणू काही ते साऱ्या जगाला न बोलता सांगत आहेत, "आम्ही अपूर्ण नाही, आम्ही स्वयंभू आहोत! तुम्ही फक्त आमच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवा आणि लढ म्हणा, मग बघा, आम्ही हे जग मुठीत कसे आणतो!"

हाच निःशब्द, तरीही अत्यंत प्रभावी संवाद मिरजच्या कै. रा. वि. भिडे मूक-बधिर शाळेच्या चार भिंतीत घुमत होता. निमित्त होतं एका ऐतिहासिक बदलाचं. ज्या मुलांना आपण समाजाच्या स्पर्धेत कुठेतरी मागे राहतील असं समजतो, त्याच मुलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सच्या विश्वाचे दरवाजे उघडले जात होते. हे स्वप्नवत वाटणारं कार्य सत्यात उतरवलं सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी. "आमची सांगली - सक्षम दिव्यांग आमचा अभिमान" हे केवळ ब्रीदवाक्य न ठेवता, त्यांनी ते कृतीत आणले. त्यांच्या संकल्पनेला पुण्याच्या 'वरशिप अर्थ फाऊंडेशन'ने दिलेला प्रतिसाद म्हणजे या मुलांच्या नशिबात उगवलेली एक सोनेरी पहाट होती.

गेले १५ दिवस, रोज तीन तास, या शाळेतील वर्ग जिवंत झाले होते. इथल्या ७३ मुला-मुलींच्या हातांना जणू भविष्याला आकार देणारे पंखच फुटले होते. जेव्हा त्यांनी थ्री-डी प्रिंटरमधून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली, तेव्हा तो केवळ एक प्रयोग नव्हता, तर त्यांच्या सुप्त सर्जनशीलतेला मिळालेला तो पहिला हुंकार होता. जेव्हा त्यांनी सेन्सॉरच्या मदतीने आग लागल्यास किंवा लाईट गेल्यास वाजणारा अलार्म बनवला, तेव्हा ते केवळ विज्ञान शिकत नव्हते, तर तंत्रज्ञान आपले मित्र आणि रक्षक कसे बनू शकते, याचा अनुभव घेत होते. जेव्हा त्यांनी चॅट-जीपीटीमध्ये स्वतः टाईप करून आपल्या मनातल्या कल्पनांना चित्रांचे रूप दिले, तेव्हा त्यांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज उरली नाही. तंत्रज्ञानाने त्यांना नवी 'भाषा' दिली, नवा 'आवाज' दिला!

ज्या मुलांना आजवर फक्त सहानुभूती मिळाली, त्यांना या कार्यशाळेने आत्मविश्वासाची आणि समान संधीची ताकद दिली. STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स) सारख्या क्लिष्ट वाटणाऱ्या क्षेत्रांची दारे त्यांच्यासाठी उघडली गेली. ही फक्त एक कार्यशाळा नव्हती; हा एका मोठ्या बदलाचा पाया आहे. ज्यांना ऐकू-बोलता येत नाही, त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचा, शिकण्याचा आणि या डिजिटल जगात अभिमानाने वावरण्याचा हा एक नवा महामार्ग आहे. या ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर, ही मुले उद्या केवळ स्वावलंबी होणार नाहीत, तर इतरांसाठी प्रेरणास्रोत बनतील. कारण ते अपूर्ण नाहीत, ते स्वयंभू आहेत. आणि त्यांचा हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे!

  • शब्दांकन : संप्रदा बीडकर,  जिल्हा माहिती अधिकारी  सांगली

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes