Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!शिवाजी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, शोध समितीसाठी नावांची शिफारसचंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, शिक्षण सहसंचालक कार्यालयांची तपासणी होणार ! कामत समितीची स्थापना !!

जाहिरात

 

कस्तुरी सावेकरकडून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर

schedule14 May 22 person by visibility 1001 categoryलाइफस्टाइल

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वास यश समर्पित
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर हिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट आज सकाळी सहा वाजता सर केले. तिच्या या उत्तुंग कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्यावर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे अपुरे सोडावे लागलेले स्वप्न तिने या वर्षी पूर्ण केले.
एव्हरेस्टवर पहिले पाऊल पडताच तिने तिरंगा व भगवा ध्वज फडकावला. तिच्या या यशामुळे कोल्हापूरकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
कस्तुरी २४ मार्च २०२२ ला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला गेलेली होती. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने चढाईसाठी जगातील १४ अष्टहजारी शिखरांपैकी सर्वात अवघड असणारे दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा -1 शिखर यशस्वीरित्या सर केले.
हे शिखर सर करून कस्तुरी चार मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प ला पोहचली. ९ मे रोजी रात्री नउ वाजता चढाईला सुरवात केली व दहा तारखेला दुपारी कॅम्प दोनला पोहोचली. तेथे दोन दिवस थांबून बारा तारखेला कॅम्प तीनला पोहोचली. दुपारी कॅम्प 4 ला पोहोचली तेथे थोडी विश्रांती घेऊन रात्री सात वाजता तिने ध्येयाकडे वाटचाल सुरू केली.
पूर्ण रात्र चालून चौदा तारखेला सकाळी हा वाजता तिने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एन्हरेस्ट वर भारताचा तिरंगा व करवीर नगरीचा भगवा ध्वज फडकवला. या मोहिमेसाठी उमेश झिरपे यांचे मागदर्शन लाभले. तसेच फिटनेस कोच व मेन्टॉर म्हणून जितेंद्र गवारे व जिम कोच म्हणून विजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. हे शिखर सर करताना तिच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा आहे. या मोहिमेला अंदाजे ४९ लाख रू खर्च येतो
आतापर्यंत ₹ लोकसहभागातून २८,५६,७०० रुपये एवढी रक्कम जमा झाली होती. उर्वरीत रक्कम कस्तुरीच्या पालकांनी समाजातील घटकांकडून शब्दावर कर्ज काढून उभी केली आहे. या जिगरबाज करवीर कन्येला पुढील भावी वाटचाल यशस्वी करण्यासाठी तिच्या पालकांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा करवीर हायकर्स ग्रुपने मदतीचे आवाहन केले आहे. मदतीसाठी बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे आहेत, खात्याचे नाव -करवीर हायकर्स,
स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा प्रतिभानगर कोल्हापूर . A/C No. 39214749732 IFSC Code SBIN0017527

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes