Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!

जाहिरात

 

सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटे

schedule28 Sep 26 person by visibility 232 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन :  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वैद्यकीय शिक्षणमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांचे चिमटे काढले.  या दोघांच्या  राजकीय चिमटयांनी उपस्थित सभासदासह व्यासपीठावरील नेतेमंडळीची मात्र हसता हसता पुरेवाट झाली.

गोकुळ निवडणुकीची धामधूम सुरू असताना बँकेच्या सभेच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर होती. यामुळे सभेला उपस्थित सभासदांचे लक्ष व्यासपीठावरील नेतेमंडळी व त्यांच्या भाषणाकडे होते. व्यासपीठावर सभेला बँकेचे व्हाईस चेअरमन राजू आवळे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, संजय घाटगे, ए वाय पाटील, अर्जुन आबिटकर,  सुधीर देसाई, विजयसिंह माने, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुरलेकर, संतोष पाटील, राजेश पाटील, रणजीत पाटील, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर, दिलीप लोखंडे, गजानन पाटील यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात मंत्री मुश्रीफ यांनी बँकेचे कामकाज, विविध योजना, भविष्यकालीन धोरण यासाऱ्या बाबींचा ऊहापोह केला. भाषणाच्या समारोपाकडे वळताना त्यांनी आमदार पाटील यांच्याकडे पाहत, ‘गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचारातूनही वेळात वेळ काढून आमदार पाटील से वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले. त्यांचे मी आभार मानतो.’अशा शब्दांत चिमटा काढला. मुश्रीफ यांच्या विधानावर व्यासपीठावरील सगळया नेतेमंडळीसह आमदार सतेज पाटील यांनाही हसू आवरता आले नाही. उपस्थित सभासदांनीही हसत हसत मुश्रीफ यांच्या विधानाला दाद दिली. मुश्रीफ यांच्या विधानावर आमदार पाटील काय बोलणार याविषयी उपस्थितांत उत्सुकता वाढली. साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. आमदार पाटील यांनी मुश्रीफ यांच्याकडे पाहत, ‘ ए. वाय. पाटील यांना घेतलाय का बघायला आलो’अशा मोजक्या शब्दांत टोला लगावला. आमदार पाटील यांच्या या विधानाने सभेत पुन्हा एकदा हास्य पिकले.  

कारण जिल्हा परिषद निवडणुकीपासून ए वाय पाटील हे काँग्रेस सोबत होते. ते गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत राहणार की महायुती सोबत यावरुनही चर्चा रंगली होती. ए. वाय. पाटील यांनी सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय गोकुळच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापत आहे. निवडणूक होणार की बिनविरोध होणार, बिनविरोध झाली तर कोणाला किती जागा, प्रत्येक पक्षाचे उमेदवार किती अशा चर्चा रंगत आहेत. दुसरीकडे जागा वाटपावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. रविवारी, महायुतीमधील नेत्यांमधील झालेला वाद, पदाधिकाऱ्यांतील संघर्ष या घटना ताजा आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes