Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!

जाहिरात

 

संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिक

schedule28 Sep 26 person by visibility 199 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा. निवडणूक जिंकलो की प्रणाली योग्य आणि निवडणुकीत पराभव झाला की आयोग दोषी, ईव्हीएमवरुन आरोप करणे हा विरोधी पक्षांचा रडीचा डाव थांबला पाहिजे. जिथं काँग्रेसची सत्ता येते त्या ठिकाणी ईव्हीएम योग्य आणि ज्या ठिकाणी भाजप जिंकतो तेथे ईव्हीएम प्रक्रियेत दोष अशी विचित्र मानसिकता काँग्रेसची बनली आहे.’असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

एसआयआर प्रक्रियेत दोष आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत. भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप करत काँग्रेसतर्फे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाला खासदार महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत चोख उत्तर दिले. महाडिक म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या स्पष्ट आणि रोखठोक पत्रकार परिषदेमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत आणि मतदार याद्यांबाबत निर्माण केल्या गेलेल्या अनेक गैरसमजांना पूर्णविराम मिळाला आहे.

राजकीय स्वार्थासाठी आणि पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचे प्रकार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थांबविला पाहिजे. निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि इतर संवैधानिक संस्थावरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी गंभीर विषय आहे.लोकशाहीमध्ये संस्थावर प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र त्या प्रश्नांसाठी ठोस तथ्ये आणि पुरावेही जनतेसमोर ठेवले पाहिजेत. संविधानावर विश्वास असेल, तर संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर आणि जनतेच्या जनादेशावर विश्वास ठेवायलाच हवा. विविध निवडणुकीत काँग्रेसचा सातत्याने पराभव का होत आहे याचे संबंधितांनी आत्मचिंतन करावे असेही खासदार महाडिक म्हणाले.

पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महापालिका सभागृह नेते मुरलीधर जाधव, भाजपचे पदाधिकारी महेश जाधव, जिल्हाध्यक्ष  नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, राहुल चिकोडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes