फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !
schedule28 Sep 26 person by visibility 408 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत परिसरात बिबटयाचा वावर आढळून आला आहे. सोमवारी, (२८ सप्टेंबर २०२६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसला. शालिनी पॅलेसच्या हॉटेल शेजारील फुलेवाडी रोडवरील पेट्रोल पंपाच्या शेजारी बिबट्या आढळला असे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरी वस्ती परिसरात बिबट्या आढळल्याने वन विभागाचे पथक, पोलिस फौजफाटा या परिसरात दाखल झाला आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केेले आहे. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बिबटयाचा शोध घेतला जात आहे.