जयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा
schedule28 Sep 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी, सोमवारी (२८ सप्टेंबर २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. आमदार आसगावकर यांनी, मुंबई येथील पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. प्रा. आसगावकर यांनी आमदारकीच्या गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची महिती दिली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्याचा ‘कार्यपूर्तीचा लेखाजोखा’ मांडला. तसेच शिक्षक मतदारसंघातील चालू असलेल्या मतदार नोंदणीची सद्यस्थिती व आतापर्यंत झालेल्या आकडेवारीबाबत पवार यांना माहिती दिली. याप्रसंगी पवार यांनी आमदार आसगावकर यांना शैक्षणिक व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य व्ही. एम. पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.