Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!

जाहिरात

 

जिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाच

schedule28 Sep 26 person by visibility 282 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन : 'कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष मी वार्षिक संस्थावर सभा सोमवारी (28 सप्टेंबर 2026) झाली. बँकेचे चेअरमन व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे  सभेच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या अगोदर होणारी ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा ठरली. यामुळे या सभेकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. या सभेत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडला. सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी, शेतकरी वर्ग, प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने मध्यवर्ती बँक गेल्या पाच वर्षात प्रचंड कामगिरी केले आहे. चेअरमन म्हणून पाच वर्षे सेवा करण्याची संधी मला मिळाली. सगळ्यांच्या सहकार्यामुळेच बँकेला धवल यश मिळाले. पुढे निवडणुका होणार आहेत. यामुळे आता पुढे काय होणार हे मी सांगू शकत नाही.' असे विधान मुश्रीफ यांनी केले. आरबीआय नियमानुसार सलग दहा वर्ष संचालकपद भूषविलेल्या  संचालकांना आता निवडणूक लढवता येणार नाही. या पाश्र्वभूमीवर मंत्री मुश्रीफ आमचे यांचे हे विधान मानले जाते. सभेला बँकेचे व्हाईस चेअरमन राजू आवळे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संचालक आमदार सतेज पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, संजय घाटगे, ए वाय पाटील, अर्जुन आबिटकर,  सुधीर देसाई, विजयसिंह माने, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुरलेकर, संतोष पाटील, राजेश पाटील, रणजीत पाटील, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर, दिलीप लोखंडे, गजानन पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes