Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुलेवाडी परिसरात बिबट्या, वनविभागाकडून शोध ! पोलिस फौजफाटा तैनात ! !संवैधानिक संस्थावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा - खासदार धनंजय महाडिकमहाडिक उद्योग समूहाकडून दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखाची मदतजयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मांडला कर्तव्यपूर्तीचा लेखाजोखा सभा जिल्हा मध्यवर्ती बँकेची, हसन मुश्रीफ - सतेज पाटलांमध्ये गोकुळवरुन राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!

जाहिरात

 

न्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदे

schedule28 Sep 26 person by visibility 83 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘ मला पाहिजे तसा निर्णय म्हणजे न्याय नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत बसवून जो निर्णय होतो तोच खरा न्याय हाये. देशाला उत्तम न्याय तत्वे, संविधानाची मूल्ये जपणारे वकील गरजेचे आहेत. वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत, न्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद आहे याचा विसर पडू देऊ नये. अन्याय, अत्याचाराबाबत थेट भाष्य करायला हवे. ’हे बोल आहेत, अॅड. असिम सरोदे यांचे.

निमित्त होतं, डॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचतर्फे आयोजित व्याख्यानाचे. ‘माझे न्यायाचे प्रयोग’हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, विचार मंचचे अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर, सचिव प्रा. सी. एम. गायकवाड, कार्याध्यक्ष विश्वास सुतार, खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. जॉर्ज क्रूझ, संजय कळके यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला.

भाषणादरम्यान अॅड. सरोदे यांनी, कोल्हापुरातील रस्त्यांवरील खडडयांचा प्रश्न, कोर्टात याचिका, पंढरपुरातील क्षमामि चंद्रभागे कार्यक्रमासंबंधीचे अनुभव शेअर केले.केवळ पैशासाठी आपण वकिली करत नाही. चंद्रभागा नदी कशामुळे प्रदूषित होते हे पटवून दिले. स्वच्छतागृहासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाला आमची बाजू पटली. कोर्टाने वारी मार्गासह पंढरपुरात स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याचे आदेश काढले. तसेच वकील म्हणून काम करतानाचे अनुभव ऐकविले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला, पण नियमावली अद्यापही ठरवली नाही. अंनिसच्या कार्यकर्त्या सीमा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये या नियमावलीसाठी कायदेशीर लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्यस्थितीकडे लक्ष वेधत अॅड. सरोदे यांनी सध्याच्या काळात वकिलांच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे नमूद केले. वकिलांमध्येही दोन गट आहेत. कोणाला चांगले वाटावे म्हणून कायद्याचा वेगळा अन्वयार्थ काढत बाजू मांडत असतात. अशाने संविधानातील विचार सांगणे कठीण होईल. न्यायाची बाजू मांडताना, न्याय मिळवून देताना, अन्याय काय हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes