राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरी
schedule01 Apr 25 person by visibility 168 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या ज्युनिअर संघाची दमदार कामगिरी नोंदविली आहे. गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश आणि हरियाणाचा पराभव कांस्यपदक पटकावले.
लखनौ इथं झालेल्या ४७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर गटातील मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. गुजरात विरुध्द झालेल्या पहिल्या सामन्यात, महाराष्ट्राच्या संघाने २१ विरुध्द ४ अशा गोल फरकाने एकतर्फी विजय मिळवला. पंजाब विरुध्दच्या चुरशीच्या सामन्यात १९ विरुध्द १५ अशा गोल फरकाने विजय संपादन केला. त्यानंतर आंध्र प्रदेशला २१ विरुध्द ८ गोल फरकाने पराभूत केले. हरियाणा विरुध्द महाराष्ट्र संघात अटीतटीचा सामना झाला. महाराष्ट्राच्या मुलींनी कडवे आव्हान परतवून लावत, २ गोल फरकाने, बलाढ्य हरियाणा संघाचा पराभव करत, कांस्यपदक पटकावले. हँडबॉल असोसिएशन इंडियाचे सहसचिव रुपेश मोरे, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष रवी गायकवाड, सचिव राजाराम राऊत आणि भारतीय हवाई दलातील प्रशिक्षक कुणाल सुर्वे , संघ व्यवस्थापक जयश्रीताई यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले.