उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई मंदिरात महाअभिषेक
schedule27 Jul 25 person by visibility 52 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले. ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो, यासाठी विशेष अभिषेक करण्यात आला. १०१ लोकांच्या उपस्थितीमध्ये महाअभिषेक घालण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जोपासत वेळोवेळी समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या करवीर तालुका प्रमुख पाटील यांनी यनिष्ठेने हा धार्मिक उपक्रम आयोजित केला.कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, उपतालुकाप्रमुख अरुण अब्दागिरी, करण भिलुगडे, धैर्यशील पाटील यांच्यासस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.