तिटवेतील शहीद महाविद्यालयात ब्युटीशियन कोर्स सुरू होणे कौतुकास्पद-स्नेहल पाटील
schedule12 Aug 25 person by visibility 151 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहीद महाविद्यालयात सौंदर्य व हेअरस्टाईल क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ‘ब्युटीशियन कोर्स’ सुरू होत असल्याचं कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सौंदर्यशास्त्रासारख्या कौशल्याधारित क्षेत्रात प्रशिक्षण मिळणं ही खरोखरच आनंदाची बाब आहे’असे उद्गार सुप्रसिद्ध ब्युटीशियन स्नेहल पाटील यांनी काढले. राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. महाविद्यालयात एक दिवसीय ‘ब्युटी अँड हेअरस्टाईल वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले. कार्यशाळेत स्नेहल पाटील यांनी मेकअपचे विविध प्रकार, त्वचेची योग्य निगा, चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरकट, तसेच ब्रायडल, पार्टी आणि कॅज्युअल हेअरस्टाईलच्या ट्रेंड्सचे प्रात्यक्षिक दिले. प्रा. दिग्विजय कुंभार यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाला उपप्राचार्य सागर शेटगे , प्रा. अश्विनी खोत, प्रा. हर्षा उणे आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.