Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरणशाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट  शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविलेहार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!! जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभाएमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेतमहापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैनपाडळी खुर्दमध्ये धनुष्यबाणाचेच वारं… सचिन पाटलांचा विजय पक्का ! शिरोली दुमालातील प्रचारफेरीत दुमदुमला नारा !!

जाहिरात

 

महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!!

schedule06 Feb 26 person by visibility 99 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : एक काळ होता, कोल्हापुरात त्या पक्षाकडे ना कार्यकर्त्यांची फौज, ना फार मोठे संघटन. स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता आणि पद तर फार लांबची गोष्ट. कार्यकर्तेही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. अनेकदा त्यांच्या आंदोलनाची हेटाळणी व्हायची. पण त्यांची जिदद् मोठी, संघटन कौशल्य दांडगे. त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता, एक दिवस या शहराचा नगराध्यक्ष, महापौर आमच्या पक्षाचा होईलजनसंघ ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे ते स्वप्नं सहा फेब्रुवारी २०२६ रोजी साकार झाले. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रुपाराणी संग्रामसिंह निकम आणि उपमहापौरपदी शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची निवड झाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि जनसुराज्य हे सारे सध्या महायुतीचे घटक आहेत.

रुपाराणी निकम यांच्या रुपाने भाजपाचा पहिला महापौर कोल्हापुरात झाला. त्यांच्या निवडीने भाजपा परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. महापालिकेत महायुतीची सत्ता आणि पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांसोबत नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी विजयाचा गुलाल उधळला. खासदार महाडिक यांनी तर हलगी वाजवित हा विजयोत्सवाचा आवाज आणखी उंचावला. तसेच शड्ड ठोकत ‘हम भी कुछ कम नही’हे दाखवून दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाडू वाटप करत विजयाची लज्जत आणखी वाढवली.

१५ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेसाठी मतदान झाले. १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत भाजपने २६, शिवसेनेने पंधरा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने चार तर जनसुराज्य शक्ती पक्षाने एक अशा एकूण ४६ जागा जिंकल्या आहेत.. जनसुराज्य शक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्याचे बक्षीस म्हणून जनसुराज्यला उपमहापौरपद मिळाले. महापौर व उपमहापौर निवडीसाठी सहा फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभा झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेलया या सभेत महापालिकेच्या ५१ व्या महापौर म्हणून रुपाराणी निकम यांची निवड झाली. तर ४६ वे उपमहापौर होण्याचा मान नगरसेवक अक्षय जरग यांना मिळाला. महापौर व उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून अनुक्रमे सुनील शेंडे व दुर्वास कदम हे रिंगणात होते. स्पष्ट बहुमत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांनी या निवडीत बाजी मारली. निकम व जरग हे प्रत्येकी ४६ मते घेत विजयी झाले. तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेंडे व कदम यांना प्रत्येकी ३५ मते मिळाली.

दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.  सभेची नियोजित वेळ सकाळी अकराची होती. मात्र नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी हे महापालिकेसमोर दाखल होत होते. अकराच्या सुमारास सारा परिसर कार्यकर्त्यांनी गजबजला. भाजप, शिवसेना, व जनसुराज्य शक्ती पक्षाचे झेंडे नाचवित कार्यकर्ते दाखल होत होते. तासाभराच्या निवडीच्या प्रक्रियेनंतर महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. गुलालाची उधळण, कागदी फुलांचा वर्षाचा, आणि विजयाच्या घोषणा  असा माहौल महापालिका परिसरात पाहावयास मिळत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आणि जय श्रीराम असा घोष टिपेला पोहोचला होता.

कार्यकर्त्यांचा आनंद तर ओसांडून वाहत होता.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, राजेश क्षीरसागर यांच्या छायाचित्रांचे फलक उंचावत आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी फेर धरला. रुपाराणी निकम यांचे पती संग्रामसिंह निकम, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे ओपन टप जीपवर उभे राहून हात उंचावत नृत्य करत हा क्षण साजरा केला. माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महापालिकेत पोहोचल्या. खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर यांचे महापालिकेत जल्लोषी स्वागत झाले. दोघांनी एकमेकांना लाडूही भरविले. नूतन महापौर व उपमहापौरांनी, निवडीनंतर शहरातील विविध भागातील महापुरुषांच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यानंतर भाजप, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते मंडळी भाजप कार्यालयाा दाखल झाले. मंत्री पाटील यांच्या हस्ते महापौर व उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला. एकमेकांना लाडू भरवित आणि वाटप करत हा विजयोत्सव साजरा झाला. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes