Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ङङक्षतत तथजिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभाएमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेतमहापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैनपाडळी खुर्दमध्ये धनुष्यबाणाचेच वारं… सचिन पाटलांचा विजय पक्का ! शिरोली दुमालातील प्रचारफेरीत दुमदुमला नारा !!प्रभावी विकासकामांची धमक शिवसेनेच्या उमेदवारांत, पाडळी खुर्द मतदारसंघातील मतदारांचा वाढता पाठिंबा सचिन पाटील, अमित हजारे यांच्या प्रचारार्थ वाशीत प्रचारफेरीचा धडाका कौस्तुभ  गावडे - मयुरी  पाटील यांचा  विवाह  थाटामाटात   अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!

जाहिरात

 

एमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेत

schedule06 Feb 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘एमबीए आणि एमसीएच्या प्रवेशासाठी डीटीईची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. एमबीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२६ आहे. एमसीइ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. तरी एमबीए व एमसीए करु ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या  वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावेत’ असे केआयटीज आयएमईआर प्रवेश प्रमुख डॉ. प्रविण जाधव यांनी सांगितले. यंदा एमसीएची प्रवेश परीक्षा ३० मार्च होणार आहे. एमबीए प्रवेश परीक्षा येत्या सहा, सात आणि आठ एप्रिल व नऊ मे २०२६ रोजी होणार आहे. या प्रवेश परीक्षा दिल्या तरच सरकारकडून वेगवेगळ्या सवलतींसाठी विद्यार्थी पात्र ठरतील.तसेच या परीक्षांमुळे फीमध्ये सवलत मिळणार आहे. एमबीएला प्रवेश घेऊ ईच्छिणारे विद्यार्थी या वर्षापासून मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, फायनान्स, ऑपरेशन, सिस्टिम्स, इंटरनॅशनल बिझनेस, आंत्र्यप्रुनरशिप, हॉस्पिटॅलिटी या विविध विषयार्पकी दोन विषय घेा्रन एमबीए करू शकतात. एमबीएच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिके आणि चॉइस बेस्ट क्रेडिड सिस्टीम सुरू आहेत. तर एमसीए केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या जगता संधी मिळत आहेत. भविष्यात कुशल मनुष्यबळाची निर्मिती आणि विकास व्हावा यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे जाधव यांनी सांगितले. केआयटीमध्ये हे दोन्ही अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes