Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छच चचङङक्षथथ थछ३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!आनंदोत्सव शिक्षण विभागाने देशात अव्वल स्थान पटकाविल्याचा…संकल्प उत्कर्ष श्रेणी प्राप्तीचाभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविले

schedule07 Feb 26 person by visibility 2023 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहू मिल चौक परिसरात चारचाकी वाहनाचा अपघात झाला. शनिवारी, सात फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव क्रेटा वाहनाने तीन दुचाकींना उडविले. क्रेटाच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. शाहू मिल चौक ते उद्यमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा थरकाप उडविणारा अपघात घडला. जखमीना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिसही घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करत आहेत. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी झाली आहे. क्रेटाने धडक दिलेली दुचाकी वाहने रस्त्याच्याकडेला पडलेली आहेत. क्रेटा हे चारचाकी वाहनही पलटी झाली आहे.या दुर्घटनेत भाग्यश्री लक्ष्मण गवळी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी कर्मचारी दिपक महादेव वंशे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या अन्य तिघांवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes