जिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभा
schedule06 Feb 26 person by visibility 44 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा मंगळवारी, दहा फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराण सभागृह येथे सकाळी ११.३० वाजात सभा होणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सभेत, २३ जून २०२५ रोजी आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना २०२५- २६ अंतर्गत सात फेब्रुवारी २०२६ अखेरील खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ मधील पुनर्विनियोजनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ प्रारुप आराखड्यास मान्यता देणे व आयत्या वेळचे विषय होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली.