Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ङङक्षतत तथजिल्हा नियोजन समितीची मंगळवारी सभाएमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी अर्ज भरावेतमहापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण मंत्री खासदारांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार ! कोल्हापूर वैभववाडी प्रकल्प कामाला गती मिळावी - सुरेंद्र जैनपाडळी खुर्दमध्ये धनुष्यबाणाचेच वारं… सचिन पाटलांचा विजय पक्का ! शिरोली दुमालातील प्रचारफेरीत दुमदुमला नारा !!प्रभावी विकासकामांची धमक शिवसेनेच्या उमेदवारांत, पाडळी खुर्द मतदारसंघातील मतदारांचा वाढता पाठिंबा सचिन पाटील, अमित हजारे यांच्या प्रचारार्थ वाशीत प्रचारफेरीचा धडाका कौस्तुभ  गावडे - मयुरी  पाटील यांचा  विवाह  थाटामाटात   अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!

जाहिरात

 

महापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण

schedule06 Feb 26 person by visibility 365 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये अपेक्षाप्रमाणे महायुतीने बाजी मारली. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रूपाराणी निकम यांची महापौरपदी तर शिवसेना -  जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली. या निवडीनंतर महापालिकेसमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय,  जय भवानी जय शिवाजी,  जय श्रीराम जय घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या जल्लोषामध्ये युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,  महापौर निकम यांचे पती संग्राम निकम, उपमहापौर अक्षय यांचे वडील विक्रम जरग यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना,  राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत निकम व जरग यांना 46 मते पडली. काँग्रेस आघाडीचे महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे सुनील शेंडे व दुर्वास कदम यांना प्रत्येकी 35 मते पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes