कोल्हापुरात चौदा मार्चपासून पाच दिवसीय ताराराणी महोत्सव
schedule11 Mar 26 person by visibility 59 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता बचत गटांकडून उत्पादित वस्तूंचे ‘ताराराणी महोत्सव व मिनी सरस’ १४ मार्च ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या पुढाकारातून हा महोत्सव होत आहे. न्यू शाहूपुरी येथील सासने ग्राऊंड येथे हा प्रदर्शन भरत आहे. रोज सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत प्रदर्शन खुले असेल. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे संचालक व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी यासंबंधातील माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. शनिवारी, चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.