ज्ञानवत्सल स्वामींचे प्रेरणादायी भाषण, भारावलेले विद्यार्थी अन् जीवनात सफल होण्याचा सक्सेस मंत्रा
schedule11 Mar 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘पदवीधर, पदव्युत्तर, पीएचडी प्राप्त तरुण मित्रांनो, पदवीप्राप्तीनंतर तुमच्या नवीन जीवनाला सुरुवात होतेय. आयुष्याच्या या टप्प्यावरुन प्रवास करताना तुमच्यासमोर अनेक संधी, करिअरजची दालनं, सामाजिक व वैयक्तिक आव्हाने उभी असणार आहेत. जीवनात सफल होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सदैव सकारात्मक वृत्ती बाळगा, मी हे करु शकतो हा आत्मविश्वास अंगी रुजवा. नैतिक मूल्यांची जोपासना करा आणि सामाजिकदायित्व जबाबदारीने पार पाडा…शिक्षण आणि प्रशिक्षणातून नववनीन कौशल्य आत्मसात केली असतील त्या कौशल्यासोबतच माणसाचं मनं जिंका…लोकांचे प्रेम मिळवा…आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणं…यासारखे समाधान आणि आनंद दुसऱ्या गोष्टीत नाही.’अशा प्रेरणादायी भाषणांनी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे डॉ. ज्ञानवत्सल स्वामी तरुणाईला सक्सेस मंत्रा दिला.
निमित्त होतं, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभाचे. कदमवाडी येथील डॉ.डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाच्या परिसरात दिमाखदार सोहळयात ७४१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने व चौदा विद्यार्थ्यांनी पीएडीने सन्मानित केले. संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. तन्वी संजय देसाई यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्णपदकांनी गौरविले. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डॉ. दत्ता मेघे युनिव्हर्सिंटीचे कुलगुरु वेदप्रकाश शर्मा, डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त् व माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला.
प्रेरणादायी वक्ते म्हणून जगभर ख्याती असलेल्या डॉ.ज्ञानवत्सल स्वामी यांनी तासाभराच्या भाषणात मुक्तचिंतन करत विद्यार्थ्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. कधी इंग्रजी, कधी हिंदीतून संवाद साधत त्यांनी प्रभावीपणे भाषण केले. ‘डी.वाय. पाटील ग्रुपशी आपले खास नाते आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील हे जवळचे स्नेही आहेत. तीन वर्षापूर्वी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी आपली जवळपास पाऊणतास भेट झाली होती. या भेटीत मी, त्यांना तुमच्या सफल जीवनाचे गमक काय आहे अशी विचारणा केली होती. तेव्हा, डी. वाय. पाटील यांनी ‘सकारात्मक वृत्ती’ या दोन शब्दांत सफल जीवनाचे सूत्र सांगितले. डीवाय पाटील ग्रुपने कोरोना कालावधीत रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देत खऱ्या रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा याची प्रचिती घडविली. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, सेवासुविधा अशा विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करत डॉ. संजय पाटील यांनी समाज उभारणीसाठी मोठे योगदान दिले आहे. सेवाभाव आणि समर्पित वृत्तीने समाजासाठी काम करणे हे चांगुलपणाचे लक्षण आहे.’अशा शब्दांत ज्ञानवत्सल स्वामी यांनी डीवायपी ग्रुपच्या कार्याचे मुक्तकंठाने प्रशंसा केली.
जगभरातील कर्तबगारांच्या जीवनातील उदाहरणे देत त्यांनी उपस्थित तरुणाईला देश आणि समाजासाठी भरीव योगदान देण्याचे आवाहन केले. भारतीय तरुणात प्रचंड क्षमता आहे. तरुण पिढीकडे अफाट बौध्दिक संपदा आहे. सोबतीला सेवाभाव, समर्पित वृत्ती…या बळावरच भारत २०२४७ मध्ये विकसित देश आणि व विश्वगुरु बनणार असल्याचे सांगितले. आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नवं प्रेरणेची बीजे पेरताना त्यांनी तरुण वर्गाला मर्यादेची जाणीव करुन दिली. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने शिक्षणासोबतच वैद्यकीय सेवा आणि संशोधनात नवा मानदंड तयार केला आहे. १९८४ ते आजअखेर डीवाय पाटील अभिमत विद्यापीठातून पाच लाखाहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकी मानून संस्था काम करताना समाजाची सर्वांगिण उन्नतीचा ध्यास घेतला आहे.’असे नमूद केले.
डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाला माजी कुलगुरु बी. पी. साबळे, माणिकराव साळुंखे, डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू पी. एस. पाटील, डॉ. भालबा विभूते, शांतादेवी डी. पाटील, वैजयंती संजय पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील, देवश्री पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. अजित एस.पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.