Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रशासनाकडून तारीख पे तारीख ! संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने !! अद्ययावत आयटी पार्कचा कालबद्ध रोडमॅप करा, सरकारकडून जे जे होईल ते सहकार्य करू -पालकमंत्री प्रकाश आबिटकरआयटी असोसिएशनचा अनोखा संकल्प ! तोपर्यंत नो फेटा…नो सत्कार ! !सुनावणीस विलंब, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक ! सहायक निबंधक कार्यालयावर धडक !!कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरगांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची महापालिका करणार तपासणी , शुक्रवारपासून सुरुवातज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, गोकुळच्या घडामोडीवरुन भैया मानेंनी डिवचलेशिक्षण समिती सभापतींच्या बैठकीत शाळांचा दर्जा सुधारणेबाबत चर्चामित्र - बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी

जाहिरात

 

राज्य कला प्रदर्शनात कोल्हापुरातील चित्रकारांच्या कलाकृतींची निवड

schedule11 Mar 26 person by visibility 226 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य ६५ व्या  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग २०२५-२६ मध्ये कोल्हापूरमधील चित्रकार विजय टिपुगडे,शुभम चेचर यांच्या  कलाकृतींची निवड झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले.  यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, चित्रकार वासुदेव कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनामध्ये रेखा व रंग कला विभागात कोल्हापूरचे चित्रकार टिपुगडे आणि चेचर यांच्या कलाकृती प्रदर्शित झाले आहेत. प्रदर्शन ११ मार्च ते १६ मार्च, २०२६ या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी, महात्मा गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई येथे सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes