Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार…राष्ट्रवादी ठरला मोठा भाऊ!जिल्ह्यात ताकत हसन मुश्रीफांचीच ! २० जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्षपदासाठी शड्डू ! !गगनबावडयात काँग्रेसचेच वर्चस्व, सोनाली पाटील, संभाजी पाटणकर विजयीकळंबामध्ये विनीता भोगमनी फुलविले विजयाचे कमळडीवाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना  कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरणशाहू मिल चौकातील अपघातात दोघांचा मृत्यू, महापौरांची सीपीआरला तातडीची भेट  शाहू मिल चौकात अपघात, भरधाव क्रेटाने दुचाकीस्वारांना उडविलेहार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!महापालिकेतही महायुती, महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग ! जल्लोषात मंत्री, खासदार, आमदारांचाही सहभाग!!

जाहिरात

 

कळंबामध्ये विनीता भोगमनी फुलविले विजयाचे कमळ

schedule09 Feb 26 person by visibility 41 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विनिता सागर भोगम या २२०० मताधिक्क्यांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार मनिषा पाटील यांचा पराभव केला. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. येथे भाजपाचे कार्यकर्ते वसंत पाटील यांच्या स्नुषा संजीवनी पाटील यांनी बंडखोरी केली होती. यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे लक्ष लागले होते. विनिता भोगम या काँग्रेसमधून भाजपात दाखल झाल्या होत्या. विनिता भोगम यांचे पती सागर भोगम हे कळंबा गावचे माजी सरपंच आहेत. भोगम यांनी २१ जानेवारी  २०२६ रोजी भाजपात प्रवेश केला होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes