गगनबावडयात काँग्रेसचेच वर्चस्व, सोनाली पाटील, संभाजी पाटणकर विजयी
schedule09 Feb 26 person by visibility 82 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा कायम राहिला. तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार सोनाली विलास पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कल्पना एकनाथ शिंदे यांच्यावर विजय मिळवला. असळजमध्ये काँग्रेसचे उमेदवार संभाजी शांताराम पाटणकर, शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामचंद्र पाटील व अपक्ष उमेदवार महेश बाळासो देसाई अशी लढत झाली. यामध्ये काँग्रेसचे पाटणकर विजयी झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे.