Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतील

जाहिरात

 

शिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!

schedule07 Nov 26 person by visibility 172 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत. शिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता आहे. शाळा आणि शिक्षकांसाठी राबणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील पाचही जिल्हयात संपर्क कार्यालये सुरू करत आहे. शिष्यवृत्तीसह एनएमएमएस परीक्षेची विद्यार्थ्यांची उत्तम तयारी व्हावी यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात पाचही जिल्ह्यात शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित केली जाईल. मराठी शाळांचे संवर्धन, शाळा बाह्यकामांतून शिक्षकांची मुक्तता, जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या अन्य प्रश्नांच्या सोडवणूक…अशा विविध पातळीवर काम करण्याला प्राधान्य राहील…’ हे आश्वासक बोल आहेत, नूतन शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांच्यासोबत स्नेहसंवाद आयोजित केला होता. हॉटेल अयोध्या येथे शनिवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बोलताना आमदार गावडे यांनी, ‘निवडणुकीच्या कालावधीत पाचही जिल्ह्यात विविध घटकांकडून  मला आईसारखं प्रेम मिळालं. हे प्रेम, हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही.’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गावडे यांनी,आमदार म्हणून आगामी सहा वर्षाच्या कार्यकाळातील रोडमॅप स्पष्ट केला. शैक्षणिक विकासाचा दृष्टिकोन, शिक्षकांच्या प्रश्नावरील भूमिका आणि भविष्यातील प्राधान्यक्रमाची मांडणी केली. आमदार गावडे म्हणाले, ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी स्वतची संपत्ती खर्च केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा, सामाजिक सेवेचा आणि प्रगतशील विचारांचा वारसा सक्षमपणे पुढे चालविणे ही आपली जबाबदारी आहे. वाडया वस्तीत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या मराठी शाळांच्या संरक्षण आणि विकासासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील २६ हजार शिक्षकांच्या जुनी पेन्शनसंबंधी पर्यायी सूत्र तयार करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरचे हिवाळी अधिवेशन झाले की, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सलग तीन दिवस बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. वेतनेतर अनुदान टप्पा वाढवून मिळणे, संच मान्यता जाचक निर्णय रद्द करणे  यासाठी प्रयत्नशील आहे’

प्रत्येक जिल्ह्यातील टॉपची ५० मुले निवडणार…

आमदार गावडे म्हणाले ‘मराठी शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. पहिला टप्पा म्हणून येत्या डिसेंबर महिन्यात पाचही जिल्ह्यात शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेच्या तयारीसाठी सराव परीक्षा आयोजित करणार आहे. सराव परीक्षेनंतर  प्रत्येक जिल्ह्यातील टॉपची ५० मुले निवडून त्यांच्यासाठी दोन दिवसीय निवासी मार्गदर्शन शिबिर घेणार आहे. त्या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना संबोधित करतील.. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवं. शिवाय गुणवत्तापूर्ण शिक्षणाला संशोधनाची जोड हवी. ’

……………

सकारात्मक वृत्तीने काम करणार

कौस्तुभ गावडे म्हणाले ‘निवडणुकीत मला लक्ष्य करण्यात आलं. व्यक्तिगत टीकाटिप्पणी झाली. आमच्यासमोर खूप मोठी आव्हानं होती. संकट उदभवली. मात्र मी सकारात्मक वृत्तीने काम करत राहिलो. शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार होते. ते सारे जण मला हरविण्यासाठी प्रयत्नशील होते आणि मी विजय प्राप्त करण्यासाठी लढत होतो. पाचही जिल्ह्यात मला मोठी साथ मिळाली….आईसारखं प्रेम मिळालं... ते प्रेम...ते ऋण न विसरण्यासारखे.'

………………….

एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही जबाबदारी माझी

‘यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. शेतकऱ्यांसमोर तर भयानक संकट आहे. शिक्षण चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी अतिशय जबाबदारीने सांगतो, दुष्काळामुळे शेतकऱ्याचा एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकले पाहिजे. कोणाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. शिक्षणापासून कोणी वंचित  राहू नये ही जबाबदारी माझी.’असा शब्दही आमदार गावडे यांनी दिला. पत्रकार परिषदेवेळी गौरव गावडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes