पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळा
schedule07 Nov 26 person by visibility 49 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे संस्थापक सरचिटणीस तथा माजी अध्यक्ष प्रभाकर तथा बाबा सावंत यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी ( ७ नोव्हेंबर, २०२६) अभिवादन कार्यक्रम आयोजित केले होते. शिवाजी विद्यापीठ सेवक संघ आणि सावंत परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात कुलगुरू आर. के. कामत, खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते बाबा सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, नगरसेवक वैभव माने, सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, सेवक संघाचे माजी पदाधिकारी संभाजी जगदाळे, अधिसभा सदस्य धैर्यशील यादव, सावंत परिवारातील वीरेंद्र उर्फ बंटी सावंत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, रुद्र सावंत उपस्थित होते.