Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडेकोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढालहसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करू यागवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे- प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळच्या दुधाची विक्रमी विक्री, गुढीपाडवा-रमजान ईदला मिळून 43 लाख लिटरची विक्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेशअधिकाऱ्यांना शिवीगाळ- महापालिकेत शडडू, सभागृहाला न शोभणारी मर्दुमकी ! नगरसेवकांच्या कृत्यामुळे, नेत्यावर माफीची वेळ ! !नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफसीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ? लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढी

जाहिरात

 

हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करू या

schedule21 Mar 26 person by visibility 65 category

महाराष्ट्र न्यूज वन : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाला.   केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप  भैया माने यांनी  मार्गदर्शन केले केले. हा वाढदिवस अजित पवार यांना अपेक्षित असलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम व स्पर्धा अशा समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करूया, असेही ते म्हणाले.
         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्याची बैठक झाली. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू  होते.गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या वाढदिनी कुणीही शुभेच्छा दर्शक डिजिटल बोर्ड अथवा बॅनर लावू नका.
         मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन......!
या बैठकीत पत्रकार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केलेल्या आवाहनाचे वाचन केले. ते असे...गुरूवारी २६ मार्च रोजी माझा वाढदिवस आहे. आपण हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने आणि समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून करावा.
    वाढदिवस समितीचे अध्यक्ष  भैय्या माने यांनी आपली सर्वांची बैठक बोलावलेली आहे. कदाचित आपल्याला माहिती नसेल, राज्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळींच्या वाढदिवसाच्या तारखा अजित पवार यांच्याकडे असायच्या. भल्या सकाळी साडेसहा - सातलाच त्यांचा फोन खणाणायचा. "वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेनी मेनी हॅपी रीटर्न ऑफ धिस डे" अशा शुभेच्छा ते सर्वांना द्यायचे. आता येत्या वाढदिवसाला  साडेसहा -सात  वाजता मला हा फोन येणार नाही. यापुढे हा आवाज आपल्याला कधीच ऐकायला येणार नाही. याचे फार मोठे शल्य, दुःख आणि वेदना माझ्या हृदयात आहेत.  वाढदिवसाला त्यादिवशी आपण सर्वांनी कुठेही बॅनर, डिजिटल बोर्ड लावू नयेत,  अशी माझी विनंती आहे.
   दरम्यान नियोजनाच्या बैठकीला चंद्रकांत गवळी, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते,  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, शशिकांत खोत, दलितमित्र बळवंतराव माने, संजय चितारी, राजेंद्र माने, सूर्याजीराव घोरपडे, प्रवीणसिंह भोसले, सुनीलराज सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, पंचायत समिती उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, आजामरा पंचायत समितीचे सदस्य विकास चोथे, गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे, उदय परीट, नागेश चौगुल उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी स्वागत  केले.  विकास पाटील- कुरूकलीकर यांनी प्रास्ताविक केले.
....

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes