Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडेकोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढालहसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करू यागवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे- प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळच्या दुधाची विक्रमी विक्री, गुढीपाडवा-रमजान ईदला मिळून 43 लाख लिटरची विक्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेशअधिकाऱ्यांना शिवीगाळ- महापालिकेत शडडू, सभागृहाला न शोभणारी मर्दुमकी ! नगरसेवकांच्या कृत्यामुळे, नेत्यावर माफीची वेळ ! !नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफसीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ? लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढी

जाहिरात

 

गवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे- प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर 

schedule21 Mar 26 person by visibility 84 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीत गवळी समाजाचे योगदान मोठे आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाज शताब्दी महोत्सवी इमारत ही समाजाच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील प्रगतीच्या ध्यासाचे जिवंत प्रतीक आहे. ही इमारत केवळ एक वास्तू नसून समाजाच्या एकतेचा आणि अथक परिश्रमांचा पुरावा आहे, असे गौरवोद्गार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी काढले. 

कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत गवळी समाज कोल्हापूर यांच्या शताब्दी महोत्सवी इमारतीचा उद्घाटन सोहळा झाला. या अत्याधुनिक वास्तूच्या नूतनीकरणासाठी स्वखर्चातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  समाजाच्यावतीने आमदार क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

 आमदार  क्षीरसागर पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीत गवळी समाजाचे योगदान मोठे आहे, आणि ही शताब्दी महोत्सवी इमारत त्या वारशाचा सन्मान करत आहे. हा समाज नेहमीच माझ्या सामाजिक आणी राजकीय वाटचालीत माझ्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचे नेहमीच समाधान आहे. ही इमारत फक्त वीट आणि सिमेंटची रचना नाही, तर आपल्या समाजाच्या एकतेचे, परिश्रमाचे आणि प्रगतीच्या ध्यासाचे प्रतीक आहे. अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि एकजुटीमुळे आज आपण हा सुवर्ण क्षण अनुभवत आहोत.

यावेळी  स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका सौ.मंगल साळोखे, नगरसेविका दिपा ठाणेकर, रमेश आंबरखाने, किरण निळकुंदे, शिवाजी तोडले, भारत सदगुरु, गणेश मंगानूर, अंजू पतंगराये, संदिप ढणाल, बबनराव गवळी, विकी मोतीपुरे, सुनिल गाताडे, राहुल नष्टे, इंद्रजीत आडगुळे, प्रशांत गवळी, दादासाहेब गवळी, योगिराज गवळी, गणेश मोतीपुरे, शैलेश गवळी, योगेश मारटकर, परशराम तोडले, विनायक गवळी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes