आरोग्य, बांधकामचे मुख्य अधिकारी रजेवर ! अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार!!
schedule19 Nov 26 person by visibility 90 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हा परिषद प्रशासनातील प्रमुख विभाग म्हणून आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाची ओळख. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता आणि आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी ही दोन्ही महत्वाची पदे. दरम्यान या दोन्ही पदाचा कार्यभार आता प्रभारी चालवित आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी हे सोळा नोव्हेंबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. ते, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी रुजू होणार आहेत. त्यांचा कामकाजाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद देशमुख यांच्याकडे सोपविला आहे. तर बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील हे ९ डिसेंबर २०२६ पर्यंत वैद्यकीय रजेवर आहेत. पाटील हे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांच्या कामकाजाचा अतिरिक्त कार्यभार सध्या उपअभियंता पोळ यांच्याकडे आहे.