Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोडसह्याद्रीच्या रक्षणासाठी जागरण यात्रा, पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळा यात्रा कॅननचे कोल्हापुरात अत्याधुनिक प्रॉडक्शन प्रिंटर्सचे प्रदर्शनजिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची मासिक भेट; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शनडीवाय पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलएकल महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; नगरसेविका मंगल साळोखे यांचा पुढाकारशिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक - प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा, बुधवारी वितरण समारंभपंडित उल्हास कशाळकर, युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखेंना गुणीदास पुरस्कार ! सहा डिसेंबरला वितरण समारंभ !!भलेबहाद्दर नगरसेवक....लक्ष्य गांधीनगरवर ! निशाणा प्रशासनावर !!अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!

जाहिरात

 

सह्याद्रीच्या रक्षणासाठी जागरण यात्रा, पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळा यात्रा

schedule19 Nov 26 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘भीमाशंकर, तारळी पाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातही पाच पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्र समृद्ध जंगल उद्धवस्त केले जाणार आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र समृद्ध जंगल संपुष्टात आणून पंप स्टोरेज प्रकल्प उभारणीला विरोध आहे. सह्याद्रीच्या रांगा उद्धवस्त करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे अवशेष संपविण्याचा हा डाव आहे. तेव्हा सह्यादीच्या रक्षणासाठी व नागरिकांत जनजागृतीसाठी पारगड ते रायगड जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. या जागरण यात्रेचा पहिला टप्पा म्हणून ३० नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत चंदगड तालुक्यातील पारगड ते पन्हाळगड अशी जागरण यात्रा निघणार आहे. ‘असे सह्याद्री वाचवा अभियानचे कॉम्रेड संपत देसाई व प्रा. सुनील शिंत्रे यांनी सांगितले.

‘या जागरण यात्रेमध्ये साहित्यिक राजन गवस, कृष्णात खोत सहभागी होणार आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. अन्य लेखक व कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पारगड गडावरुन यात्रेची सुरुवात तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता होईल.’ असे देसाई यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये यात्रेला प्रारंभ होईल. तिथून यात्रा हेरे मार्गे चंदगड येथे येईल. चंदगडमध्ये सभा होणार आहे. धामापूर कुरणी येथे सभा करुन आजरा येथे यात्रा मुक्कामी असेल.एक डिसेंबर रोजी ही यात्रा पेरणोली, देवकांडगाव, नवले, पाटगाव, कडगाव अशी निघेल. कडगाव येथे सभा होऊन शेळोली, मडूरहून गारगोटीत पोहोचेल. या ठिकाणी सभा आहे. दोन डिसेंबर रोजी ही यात्रा मुदाळतिट्टा, सरवडे, धामोड, आसुर्ले ते पन्हाळा अशी निघेल. पन्हाळा येथे सायंकाळी पाच वाजता सभा होऊन सांगता होईल. पत्रकार परिषदेला कृष्णा भारतीय,अवधूत पाटील, डी. के. बोडके उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes