कॅननचे कोल्हापुरात अत्याधुनिक प्रॉडक्शन प्रिंटर्सचे प्रदर्शन
schedule19 Nov 26 person by visibility 38 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: प्रिंटींग क्षेत्रातील जागतिक अव्वल दर्जाच्या कॅनन कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन प्रॉडक्शन प्रिंटर्सची मॉडेल दाखल झाली आहे. कॅनन कंपनी व फिक्समन सर्व्हिसेस यांच्यातर्फे कॅनन इमेज प्रेस व्ही ७७० अत्याधुनिक प्रिंटरचे येथील सयाजी हॉटेलमधील मारवा हॉल येथे २३ व २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रदर्शन भरविले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रदर्शन खुले राहील अशी माहिती फिक्समन सर्व्हिसेसचे प्रमुख् रवींद्र ढाळे व संचालक स्वानंद ढाळे यांनी पत्रकार परिषेदत दिली.या मशीन्सचा उपयोग ग्राफिक प्रिंटींग, कमर्शियल आर्टिस्ट डिझायनर्स, अॅडव्हरटायझिंग कंपनी, पुस्तक निर्मिती उद्योग प्रिंटींग प्रेस, फोटोग्राफर्स, साइन बोर्डससाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनात मशिन्सचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ऑल इंडिया प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय थोरवत यांच्या हस्ते व कोल्हापूर मुद्रक संघ उपाध्यक्ष अभिजीत पडवळे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला नामदेव शेवाळे, धनश्री माने, श्रद्धा पानारी आदी उपस्थित होते.