Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची मासिक भेट; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शनडीवाय पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलएकल महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; नगरसेविका मंगल साळोखे यांचा पुढाकारशिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक - प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा, बुधवारी वितरण समारंभपंडित उल्हास कशाळकर, युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखेंना गुणीदास पुरस्कार ! सहा डिसेंबरला वितरण समारंभ !!भलेबहाद्दर नगरसेवक....लक्ष्य गांधीनगरवर ! निशाणा प्रशासनावर !!अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !केआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार 

जाहिरात

 

जिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची मासिक भेट; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शन

schedule18 Nov 26 person by visibility 110 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रत्येक शाळेत डॉक्टरांची मासिक भेट आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला.शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक झाली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडे पाठविण्याबाबत येईल.

बैठकीत सरकारी निर्णय व परिपत्रकांचे वाचन करून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. यावेळी धोकादायक वर्गखोल्यांचे निर्लेखन, नवीन वर्गखोल्यांची वाढ करण्यास परवानगी, वर्गखोल्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक मंजुरी देण्यात आली. तसेच मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी व त्यांची सर्वांगीण तयारी व्हावी, या उद्देशाने दर शनिवारी एक तास विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान  विषयाचे मार्गदर्शन करण्याबाबत शिक्षकांना सूचना देण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढण्यासोबतच भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे.

 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, आरोग्य संवर्धन आणि सर्वांगीण विकास या बाबींना प्राधान्य देत शिक्षण समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेत  शिक्षण समितीचे सदस्य एकनाथ पाटील, अमरसिंह चव्हाण, रेखा मुगडे,स्नेहल वेल्हाळ, शुंभांगी कुंभार, उत्तरा शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह निमंत्रित सदस्यांनी सहभाग घेतला. शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच शिक्षण समितीवर निमंत्रित व तज्ञ सदस्य म्हणून निवड झालेल्या सदस्य मुख्याध्यापक गणपती शंकर पाटील, मुख्याध्यापक, अर्जुन दिनकर पाटील, मुख्याध्यापक राजमोहन जगन्नाथ पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes