महापालिकेच्या सिटी इंजिनीअरपदी हर्षजीत घाटगे, जल अभियंतापदी रमेश मस्कर
schedule03 Jun 25 person by visibility 70 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका शहर अभियंतापदाचा कार्यभार हर्षजीत घाटगे व जल अभियंतापदी रमेश मस्कर यांच्याकडे सोपविण्यात आला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली.
महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी (२ जून २०२५) अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. घाटगे हे जल अभियंता होते. त्यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कार्यभार देण्यात आला. नगररचना विभागाकडी उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्याकडे जल अभियंतापदाचा कार्यभार सोपविला. मस्कर यांच्याकडे राज्यस्तर नगरोत्थान, मूलभूत सेवासुविधा अंतर्गत प्राप्त निधीमधील कामे, अमृत दोन या प्रकल्पाचे अतिरिक्त कामकाज सोपविले आहे.जल अभियंतापदाची जबाबदारी सांभाळून इतर प्रकल्पाचे कामकाज सांभाळायचे आहे.तर मस्कर यांच्याकडील नगररचना विभागाकडील उपशहर रचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार एन. एस. पाटील याच्याकडे दिला.