Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!

जाहिरात

 

गुरु- शिष्य कला प्रदर्शन 15 मार्चपासून, युवा कलाकार पुरस्कार सुदर्शन वंडकरना

schedule10 Mar 25 person by visibility 360 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  टी. के. वडणगेकर यांच्या रौप्य महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त 'गुरू-शिष्य' उपक्रमांतर्गत कला प्रदर्शनाचा प्रारंभ १५ मार्चपासून होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण शास्त्रीय गायक विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी निवृत्त उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, कला दिग्दर्शक दिलीप रोकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम दिनांक १५ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता होईल. 

  या वर्षीचा के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार छायाचित्रकार सुदर्शन वंडकर यांना जाहीर झाला आहे.छायाचित्रकार सुदर्शन वंडकर यांनी अनेक लक्षवेधी छायाचित्र टिपून कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतिहासात पदव्युत्तर पदवी आणि सात वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभवासह,  एक कुशल छायाचित्रकार आणि छायालेखक आहेत ज्याला विविध प्रकल्पांमध्ये विशेषज्ञता आहे. त्यांचे काम व्यावसायिक, कॉर्पोरेट, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात पसरलेले आहे, जिथे त्यांनी सातत्याने उच्च दर्जाच्या छायाचित्रांचे प्रसंगानुरूप सादरीकरण केले आहे. सुदर्शन वंडकर यांनी आजपर्यंतच्या त्यांचा  कारकिर्दीत,आकर्षक माहितीपटांचे चित्रीकरण आणि आकर्षक जाहिरातींचे चित्रीकरण करण्याचा केले आहे. सध्या ते दोन आगामी मराठी चित्रपटांसाठी असोसिएट डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी  म्हणून काम करत आहे, ज्यामध्ये त्यांची विविधअंगी प्रतिभा आणि कलाकृतीबद्दलची आवड दिसून येते.


त्यांच्या छायाचित्रांना राष्ट्रीय राज्य तसेच जिल्हास्तरावरील अनेक मान्यवर संस्थांच्या पुरस्काराने आणि पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.रौप्य महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त आयोजित कला प्रदर्शनामध्ये  विजय टिपुगडे, अजेय दळवी, विलास बकरे,विद्या बकरे, शिवाजी मस्के, मनोज दरेकर, संतोष पोवार, नागेश हंकारे, बबन माने, अभिजित कांबळे, प्रवीण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, मनीपद्म हर्षवर्धन,शैलेश राऊत, किशोर राठोड, प्रकाश मोहिते,राहुल रेपे, पुनम राऊत, सर्वेश देवरुखकर, विजय उपाध्ये, आरिफ तांबोळी, नवज्योत काळे, विवेक कवाळे, पुष्कराज मेस्त्री, शुभम कुंभार, सुदर्शन वंडकर, केदार पोवार  यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शन २१ मार्च पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes