वाढीव टप्पासाठी पाच जूनपासून कोल्हापूर-गारगोटी पायी दिंडी
schedule03 Jun 25 person by visibility 56 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या १४ ऑक्टोबर २०२४ नुसार राज्यातील सर्व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकडयांना वाढीव टप्पा देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करावीं, अन्यथा पाच जून २०२५ पासून कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानापर्यंत पायी दिंडीने जाऊन निवेदन देण्यात येणार आहेत. तसेच आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे हे आंदोलन होत आहे. पाच जून रोजी सकाळी दहा वाजता दसरा चौक येथून पायी दिंडीला सुरुवात होईल. विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सांगली जिल्हाध्यक्ष संदीप काळे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार बिंदगे यांच्यासह शिक्षक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.